सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक असणाऱ्या 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेने नुकताच 200 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेमध्ये सध्या किलवरचा शोध सुरू आहे. मागील 200 भागांमध्ये 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत सावनी मिरजकर नावाची तरुणी बेपत्ता होते. त्यानंतर सुरू होते श्रद्धा मिरजकर म्हणजे तिच्या आईच्या शोधाची गोष्ट. श्रद्धा जिवाचं रान करत सावनीला शोधून काढते. अनेक वेळा तिच्या आवाक्याबाहेर जाऊन ती गोष्टी करते. ड्रग डील करते, बंदूक हातात घेते अशा अनेक गोष्टी सावनीला शोधण्यासाठी श्रद्धा करते. अखेर अथक प्रयत्नांनंतर सावनीला शोधून काढण्यात श्रद्धा यशस्वी होते. सावनी घरी अली, तरी तिच्या मनावर झालेले आघात अजूनही पुसलेले नाहीत. अशातच इन्स्पेक्टर विजय भोसलेला किलवर जिवंत असल्याचे समजते. त्यामुळे आता सगळे किलवरला शोधताहेत. सावनीही या कामात पोलिसांना मदत करते आहे. त्यामुळे येत्या भागांत अनेक रहस्यं उलगडली जातील. तसेच चारू किलवर असेल का, सावनीला तिचा भूतकाळ आठवेल का, मिरजकर कुटुंबाची या सगळ्यातून सुटका होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या भागांमध्ये मिळतील.
Read more of this post
No comments:
Post a Comment